Posts Tagged ‘janeev’

Janeev

January 26, 2017

आपली एक  सवय असते।  ज्या गोष्टींवर आपण अवलंबून असतो किंबहुना ज्या गोष्टींवर आपल जीवन अवलंबून आहे किवा ज्यांच्या मुळे आपण आहोत त्या गोष्टींना नमन करणे, त्यांची आठवण ठेवणे, त्यांची जाणीव ठेवणे। म्हणून की काय घरात संध्याकाळी दिवे लागले किवा गेलेली विज परत आली की आपण आपले हाथ जोडून नमस्कार करतो। ही सवय आपल्याला आपल्या पुर्वजां कडून मिळाली असणार।  ते सूर्य उजाड्यावर सूर्याला नमस्कार करत असावेत।

आपलं जीवन ज्यांच्यावर अवलंबून आहे अश्या काही  गोष्टी म्हणजे वायु, जल, धरती, अग्नि, प्रकाश आणि अन्न। ह्या पैकी पहिले पांच यांना पंच महाभूत असे म्हणतात।

Advertisements